अकोला :- शहरात असलेली रेल्वेस्टेशन व बसस्टँड व इतर भागात ऑटोरिक्षाधारक आपली ऑटोरिक्षा व्यवस्थीत पार्किंग करत नसल्याचे निर्दशनात आले आहे. यामुळे शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण हात आहे. करिता त्यांच्यासाठी वाहनतळ निर्माण करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी असे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिलेत.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने रस्ते अपघातावर नियंत्रणासाठी सुचविलेल्या उपाययोजना रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करून सुधारात्मक उपाययोजना करण्यासाठी परिवहन आयुक्त यांच्या निर्देशानुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक लोकशाही सभागृहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर विजय अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे , अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) बी.के. मडावी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक एम.एच. राठोड,उपकार्यकारी अभियंता डी.पी. अडचुले, वाहतुक पोलीस अधिकारी विलास पाटील, महामार्ग पोलीस केंद्र बाळापुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रजीत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परिवहन आयुक्त यांच्या 6 जुन 2017 च्या परिपत्रका नुसार जिल्हयात ब्लॅक स्पॉटची यादी नव्याने करण्यासंदर्भात तसेच अपघात व अपघाती मुत्यूचे प्रमाण चालु वर्षात 10 टक्क्यांनी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजीत करण्यात येते.
रस्त्यावरील साधारण 500 मीटर लांबीच्या तुकडयात मागील 3 वर्षात 5 रस्ते अपघात झाले असतील. ज्यामध्ये व्यक्ती मृत किंवा जखमी झाल्या असतील अथवा जेथे मागील 3 वर्षात रस्ते अपघातात 10 व्यक्ती मृत झाले असतील अशा भागाला ब्लॅक स्पॉट मानण्यात येते. महामार्गवरील ब्लॅक स्पॉट किंवा अपघात प्रवणाची जागा शोधुन काढण्याची कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग विभागानी करावी.
तसेच राज्य मार्गावरील कार्यवाही सार्वजनिक बांधकाम आणि महानगर पालीका क्षेत्रातील रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट किंवा अपघात प्रवणाची जागा शोधुन काढण्याची कार्यवाही महानगरपालीकेने व इतर रस्त्यांवरील कार्यवाही जिल्हा परिषद यांनी करावी या संदर्भात येत्या 19 डिसेंबर रोजी बैठक जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे होणार आहे. त्यावेळी या संदर्भातील संपुर्ण माहिती व उपाययोजना सोबत आणाव्यात असे निर्देश अपर जिल्हाधिकारी श्री लोणकर यांनी दिलेत. जिल्हा सुरक्षा समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व इतर अंतर्गत रस्ते यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया यांनी बाळापुर ते कुरूम पर्यंतचे रस्त्यात असलेले खड्डे बुजविण्याचे काम 4 डिसेंबर पासुन सुरू केले असुन येत्या 15 दिवसांत काम पुर्ण होईल अशी माहिती प्रकल्प संचालक एम.एच. राठोड यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग , महानगरपालिका व जिल्हा परिषद यांनी त्यांच्या अखत्यारीतील रस्तावरील खड्डे बुजविणे, अपघात प्रवण क्षेत्रावर उपाययोजना दर्शक व सुचना फलक लावणे, अपघात प्रवण स्थळावर पोलीस विभागाचे ,आरोग्य विभागाच्या ॲब्लुन्स करिता टोल फ्री हेल्पलाईन नंबर प्रदर्शीत करणे तसेच रस्ता सुरक्षा विषयक स्लोगण वाहनाच्या मागील बाजूस प्रदर्शीत करणे यासारखे कामे करावेत अशा सुचना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.जिचकार यांनी यावेळी संबंधीताना दिल्यात.
रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस विभागाकडून विहित मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे , लाल सिंग्नल ओलांडून जाणे , मालवाहू वाहनामधुन क्षमतेपैक्षा जास्त मालाची वाहतुक करणे, दारू पिऊन किंवा अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर करणे या सारख्या गुन्ह्यावर कार्यवाही करून अनुज्ञप्ती निलंबन करण्याची कार्यवाहीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यांच्याकडे अहवाल दर 15 दिवसांनी पाठवावा अशा सुचना त्यांनी केल्यात. दर महिन्याच्या पहिल्या व तिस-या गुरूवारी याबाबत मुख्य सचिव जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडून व्हिडीओ कॉन्फरन्सीव्दारे आढावा घेण्यात येणार असल्यामुळे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या सोमवारी घेण्यात येणार आहे. तरी संबंधीतांनी माहिती घेवून उपस्थित राहावे असे आवाहन अपर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
अधिक वाचा : अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करा – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola