अकोट(प्रतिनिधी)- अकोट ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आकोट हिवरखेड रस्त्यावरील फिजा धाब्यावर काम करणाऱ्या अल्पवयीन आदिवासी बालक कुष्णा जांभेकर याची अमानुष पणे मारहाण करुन व शरीरावर चटके देवुन तसेच गुप्तांगाला इजा पोहचुन निर्घृण हत्या करण्यात आली.या प्रकरणी धाबा मालक अकबरखान यांच्या दोन मुलावर फीरोज खान अकबर खान व सलीम खान अकबर खान रा.इंदिरा नगर अकोट यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याना अटक केली आहे. परंतु पोलीसानी अद्यापही कुष्णाला मारण्याचा आरोपींचा मुळ उद्देश काय होता हे स्पष्ट केले नाही. तो स्पष्ट करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन आज बजरंग दल व विश्व हिंदु परिषदेच्या आकोट शाखेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. आकोट उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनावणे यांना काल शुक्रवार दि.१४/१२/२०१८ ला देण्यात आलेल्या याच निवेदनात मागणी करण्यात आली आहे की,
१)प्रकरणातील आरोपीवर बालकामगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.
२) बालकाच्या गुप्तांगासोबत छेळछाड झाली असल्यास पॉस्को नुसार गुन्हा नोंदवावा.
३) फीजा धाब्याचा मालक अकबर खान यांचा या हत्या प्रकरणाशी काय सबंध आहे तो तपासावा व त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा.
४) तसेच दि.६ डिसेबर च्या राञी १०-३० वाजताच्या दरम्यान एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलावर पोपटखेड रोडवरील संञा मंडित नेऊन केलेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करावी.
५) दि.११ डिसेबर २०१८ रोजी नरसिंग महाराज याञेतुन एका १२ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न अकोटातील नागरीकांच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आला असुन, यातील आरोपीला देखील नागरिकांनीच पकडून दिले आहे. त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.
६) कृष्णा जांभेकर प्रकरणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी आदिवासी बालकाला न्याय मिळावा यासाठी निवेदन दिले होते, त्या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी दिलीप बोचे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची व खोट्या केसमधे फसविण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्या कडे केली आहे.सदरचा प्रकार हा गंभीर असुन ठाणेदार मिलिंद बहाकर यांची ही कृती अयोग्य व नियमबाह्य आहे.एका सामाजिक कार्यकर्त्याला धमक्या देणे म्हणजे लोकशाहीवर घाला घालण्यासारखे कृत्य आहे.या प्रकरणी चौकशी करुन दोषी विरुद्ध कार्यवाही करावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी देण्यात आलेल्या निवेदनावर विजय गोटे, गोपाल कडाळे, विजय चदंन, सुनिल पवार, राधेश्याम बोडखे, विजय कुलट, विशाल चदंन, अशोक ताडे, गणेश भास्कर, श्रीकृष्ण ताडे, शिवा टेमझरे व जगदिश दातीर यांच्या सह्या आहेत.
अधिक वाचा : व्हिडिओ : अकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ठरत आहेत जीवघेण्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola