तेल्हारा(विशाल नांदोकार) :- शरीर सुदृढते साठी मैदानी खेळाचे महत्व अधिक असून या मैदानी खेळामुळे तरुणात ऊर्जा निर्माण होते. असे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे यांनी तेल्हारा येथील स्व. भाऊसाहेब फुंडकर क्रीडांगण, जय बजरंग चौक, तेल्हारा या मैदानावर सी.एम. चषक उद्घाटन प्रसंगी केले.या वेळी व्यासपीठावर कार्यक्रम अध्यक्ष प्रकाश चव्हाण, खा. संजय धोत्रे, तेजराव थोरात, बाबूरावजी शेळके, श्रीकृष्ण मोरखडे, राजेश रावणकर, गजानन उंबरकार, कनक कोटक, ओम सुईवाल, हरिनारायण माकोडे, जयश्री पुंडकर न.प. अध्यक्ष, अब्रार खा संजय शर्मा तसेच नगर परिषद तेल्हाराचे भाजपाचे सर्व सदस्य यांची उपस्थित होती.
पुढे बोलताना खा. धोत्रे म्हणाले की अकोट विधानसभा मतदार संघात सी. एम. चषक स्पधैमध्ये खेळाडूंची मोठ्या प्रमाणावर नोंदणी करूण लखन राजनकार व जय बजरंग सेवा प्रतिष्टान तेल्हारा ने ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणांपर्यत पोहचून त्यांना या स्पधेत सहभागी करून घेतले. त्या मुळे ह्या स्पधेत हजारो युवक सहभागी झाले आसून ह्या स्पधेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या स्पधेत खेळाची संधी मिळत आहे. लखन राजनकार व जय बजरंग सेवा प्रतिष्टान तेल्हारा ने गेल्या दोन महिन्यापासून जीवापाड मेहनत घेऊन मोठ्या प्रमाणात नोंदणीचे शिवधनुष्य पेलले.त्यामुळे लखन राजनकार यांनी केलेल्या कामगिरी बद्दल खासदार साहेबांनी लखन राजनकार व जय बजरंग सेवा प्रतिष्टान तेल्हाराचे अभिनंदन केले, तसेच ते म्हणाले की, देशातील लोकप्रिय खेळाचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला असून हजारो युवक पुढील तीन दिवस आपल्यातील कबड्डीचे कौशल्य आजमवण्याची संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रीय स्तरावर घेणाऱ्या अनेक स्पर्धा ह्या प्रकाश झोतात खेळल्या जातात त्याच धर्तीवर तेल्हारा सारख्या शहरात सुद्धा लखन राजनकार व जय बजरंग सेवा प्रतिष्टान तेल्हाराने प्रकाश झोतात कबड्डी स्पर्धाआयोजित करुन युकांना मोठी संधी उपलब्ध करू दिल्याने ग्रामीण भागातील युवकांमध्ये उत्स्फूर्तता असल्याचे ते म्हणाले, या स्पधेत पोलीस प्रशासनातील कर्मचारी यांनीही सहभाग घेतला आहे. यामुळे सर्वच स्तरावरील युवा पिढी cm चषक मध्ये सहभागी एकत्र आल्याचे ते म्हणाले. या व्यासपीठावर शासकीय क्रीडा शिकांचा खा संजय धोत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.एम. चषक चे आयोजक लखन राजनकार यांनी केले तर किशोर भागवतयांनी ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सतीश जयस्वाल यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भाजयुमोचे कार्यकर्ते व जय बजरंग सेवा प्रतिष्टानचे कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.
अधिक वाचा : तेल्हारा आगारातील अनेक कामगारांनी केला कामगार संघटनेला रामराम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola