तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथे काही वर्षांपूर्वी शहरात नागरिकांसाठी जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली होती मात्र त्याचा काही एक उपोयोग नागरिकांना झाला नाही अशातच सदर तलाव ओसाड पडला असून काल या तलावामध्ये असलेल्या साचलेल्या पाण्यामध्ये प्रताप चौक येथील आठ वर्षीय चिमुकला पडला होता यामध्ये तिथे उभे असलेल्या नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्याने त्या चिमुकल्याचा जीव वाचला.
प्रताप चौक येथील एक आठ वर्षीय सार्थक नारायण गावत्रे हा प्रताप चौक स्थित जलतरण तलाव येथे खेळत असताना तो तलावामध्ये पडला यावेळी तिथे काही कामा निमित्य देवकाबाई वैराळे ही महिला गेली असता सदर चिमुकला बुडत असल्याचे लक्षात आले.यावेळी महिलेने आरडाओरड केल्याने स्वप्नील इंगळे नामक युवकाने तलावामध्ये उडी टाकून सदर चिमुकल्याला वाचवले व दवाखान्यात उपचाराकरिता नेण्यात आले.सदर तलावाच्या बाबतीत येथील नागरिकांनी बऱ्याच वेळा न प प्रशासन तसेच नगरसेवक यांना तोंडी तक्रारी दिल्या मात्र कोणीच या बाबी कडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.सदर तलावाच्या ठिकाणी उपाययोजना करण्यात यावा तसेच तलावातील पाणी काढून टाकण्यात यावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
सदर चिमुकल्याचा काल जर जीव गेला असता तर याला जबाबदार कोण असते असा प्रश्न येथील नागरिक करीत असून न प पदाधिकारी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत नाही तसेच आम्हाला एवढेच काम नाही अशा प्रकारचे उत्तर पदाधिकारी आम्हाला देतात असा नागरींकांचा आरोप असून नागरिकानी जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी निवडून दिले असून त्याच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे बोलल्या जात आहे.तरी न प प्रशासनाने याबाबत उपाययोजना करून जलतरण तलावाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.
अधिक वाचा : भरल्या जखमेसह विधवेचे कलेक्ट्रेटवर उपोषण; 17 जणांनी केली मारहाण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola