पातूर(शब्बीर खान)-वाशिम महामार्गावर चिंचखेड़ फाट्यानजीक तेलंगणाचे वन्यजीव संरक्षण विशेष अधिकारी यांनी कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ५८ ऊंटांना जीवदान दिले होते. ऊंटांच्या तस्करीमध्ये तेलंगण, आंध्रप्रदेश,मध्यप्रदेश, राजस्थान येथील तस्करांचे मोठे रॅकेट गुंतलेले आहे. १२ नोव्हेंबर रोजी राजस्थानातून आणण्यात आलेल्या या ५८ ऊंटांचा कळप हैदराबादच्या पशु संरक्षण समितीचे वन्य संरक्षण विशेष अधिकारी सुरेंद्र भंडारी,दिनेश अपलिया, महीप जैन यांनी पकडून त्यांना तस्करांच्या तावडीतून सोडविले होते. याप्रकरणी दाखल तक्रारीवरुन पातूर पोलिसांनी भंवरलाल वक्ताराम याला अटक केली होती. पोलिस निरीक्षक डीसी खंडेराव यांनी सांगितले, की पोलिसांनी पकडलेल्या या ऊंंटांना वनराई गोरक्षणमध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये नमूद केल्यानुसार, महाराष्ट्रात या ऊंटांना ठेवण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण नाही. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांच्या उपस्थितीत या ५८ ऊंटांना १२ ट्रकमधून क्रेनच्या सहायाने गुरुवारी राजस्थानला रवाना केले. ऊंटांना रवाना करण्यासाठी सुमारे ६ लाख ५०हजार रूपयांचा खर्च झाल्याची माहिती आहे.
अधिक वाचा : तीन मोटारसायकलस्वारांनी चाकूच्या धाकावर रस्त्यात वाहन अडवून दोघांना लुटले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola