अकोला (शब्बीर खान) : शाश्वत पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. दुष्काळमुक्तीसाठी लोकांच्या सहकार्याने पाणी फाउडेंशनने सुरु केलेली सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा आपल्या जिल्हयाचा कायापालट करणारी ठरली आहे. यंदाही या स्पर्धेत जास्तीतजास्त लोकांनी सहभागी होऊन राज्यात अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. पाणी फाउडेंशन सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा-4 सन -2019 बाबत नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, पाणी फाउडेंशनचे जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड आदींसह सरपंच, तहसिलदार, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील उपस्थित होते.
अकोला जिल्हयात सन 2017 पासून वॉटर कप स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सन 2019 या वर्षाकरीता बार्शिटाकळी, तेल्हारा, पातूर व अकोट या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून स्पर्धा सुरु होणार आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत शालेय व महाविदयालयनी विदयार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. पालकमंत्री म्हणाले की, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांनी जलयुक्त शिवार हा उपक्रम सुरु केला. यामुळे मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे होऊन पाणी साठे निर्माण झाले. तर पाणी फाउडेंशनने जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देऊन राज्यात एक नवी लोकचळवळ निर्माण केली. सर्व भेद विसरुन लोक एकत्र आले. गावागावांमध्ये जलसंधारणाची अनेक कामे होऊन त्यामध्ये पाणी खेळू लागले. अकोला जिल्हयातही वॉटरकप स्पर्धेसाठी लोकांचा चांगला सहभाग मिळत आहे. पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले गाव पाणीदार करावे. या उपक्रमामध्ये मनरेगाला जोडण्याचा निश्चित प्रयत्न राहिल. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे म्हणाल्या की, प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वॉटरकप स्पर्धेत सहभागी व्हावे. आपल्या गावाला पाणी टंचाईपासून मुक्त करणाऱ्या या उपक्रमात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. काकड यांनी प्रास्तविक केले. संचालन व आभारप्रदर्शन बार्शिटाकळी तालुक्याचे समन्वयक संघपाल वाहुरवाळ यांनी केले.
अधिक वाचा : मनपा अधिकाऱ्यानी घेतला हातात झाडू, रेल्वे स्थानक परिसर केला स्वच्छ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola