अकोला- घरात घुसून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सदरपूरच्या (ता. तेल्हारा) विधवा महिलेने माथ्यावरील जखमेसह कलेक्ट्रेटवर उपोषण सुरु केले आहे. तब्बल १७ पुरुष-महिलांनी जबरदस्तीने घरात घुसून मारहाण केल्याची मीरा भास्कर मेतकर या महिलेची तक्रार आहे. तक्रारीच्या अनुषंगाने आधी या महिलेने हिवरखेड पोलिस ठाणे गाठले. परंतु पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळेच माथ्यावर भरली जखम असतानाही ती न्यायासाठी कलेक्ट्रेटवर उपोषण करीत आहे.
५ डिसेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास मेतकर, निमकर्डे, मोदे व ताथोड कुटुंबातील १७ पुरुष-महिलांनी तिच्याशी वाद घातला. पोलिस व न्यायालयात पोहोचलेल्या आधीच्या तक्रारी मागे घे, अशी त्यांची मागणी होती. मी ती ऐकायला तयार नसल्यामुळे प्रारंभी त्यांनी माझ्याशी वाद घातला. पुढे शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत चक्क मारहाणही केली, असे तिच्या तक्रारीत म्हटले आहे. संबंधितांनी यापूर्वीही तिच्या घरात घुसून असे प्रकार केले आहेत. पतीच्या मृत्यूनंतर मी मुला-मुलीसह घरी राहते.
शेतीचे मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह चालतो. परंतु संबंधितांना ते आवडत नाही. त्यामुळे वारंवार तक्रारी करुन शिवीगाळ करणे हा प्रकार नित्याचाच झालाय, असेही मीराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीसह तिने हिवरखेड पोलिस ठाणे गाठले. परंतु पोलिसांनी तिची दखल घेतली नाही. लेखी रिपोर्ट दिल्यानंतरही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे गैरअर्जदार आणखी मुजोर झाले असून त्यांचा त्रास सुरुच आहे. त्यामुळेच मीराने थेट जिल्हाकचेरी गाठून उपोषण सुरु केले आहे.
अधिक वाचा : तीस हजारांच्या लाचप्रकरणी मनपा अभियंत्याला पकडले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola