पातूर- मागून येणाऱ्या अज्ञात तीन मोटारसायकलस्वारांनी मालवाहू वाहनास अडवून दोघांना चाकूच्या धाकावर ५० हजार रुपये लुटल्याची घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान पातूर ते अकोला महामार्गावरील नंदखेड फाट्याजवळ घडली. अकोला येथील हिना बेकरीचे मालवाहू वाहन क्रमांक एमएच ३० एव्ही ०४६१ नेहमीप्रमाणे मेहकर येथून सायंकाळी मालाचे पैसे गोळा करून परत येत होते.
मेहकरवरून १४ डिसेंबरला सायंकाळी अकोलाकडे परत जात असताना नंदखेड फाट्याजवळ टाटा यस हिना बेकरीच्या गाडीचे चालक शेख अन्सारी शेख अजगर वय २४ वर्ष रा. सोनटक्के प्लॉट अकोला व कंडक्टर अब्दुल कदर अब्दुल आरिफ यांच्या समोर मागून तिघांनी आपली मोटरसायकल नेऊन बेकरीचे वाहन थांबवण्याचा इशारा केला. यावेळी चालकाने गाडी न थांबवल्यामुळे अज्ञात मोटारसायकलस्वारांनी गाडीला अडवून प्रथम काचेवर दगड मारला व दोघांनी गाडीचे काच उघडण्यास सांगितले.
चालकाने काच खाली केला नाही म्हणून त्याने चालकाच्या गळ्याला चाकू लावला व त्यांचाजवळील दिवसभरात जमा केलेली सर्व रोख रक्कम व मोबाईल, पॉकेट व गाडीची चाबी घेऊन पोबारा केला. तिन्ही मोटारसायकलस्वार हे मराठी व हिंदी भाषेत बोलत होते. या घटनेची माहिती तत्काळ पातूर पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठले. स्थानिक गुन्हे शाखा व एसडीपीओ बाळापूर सोहेल शेख व अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी घटनास्थळा भेट देऊन पातूर पोलीस स्टेशन गाठले. तसेच जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.
अधिक वाचा : पातूर शहरात 2 सोन्याच्या दुकानात शटर तोडून चोरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola