अकोला (प्रतिनिधी) : महापालिकेच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्याला ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने बुधवारी रंगेहात पकडले. ठेकेदारांचे आठ लाख ५० हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यास फाइल पुढे सरकवण्याच्या मोबदल्यात त्याने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
सईद अहमद शेख मुसा (वय ४१, पद कनिष्ठ अभियंता, वर्ग ३) हा कंत्राटी मानधन तत्वावर महापालिकेत गेल्या १५ वर्षापासून कार्यरत आहे. महापालिकेकडे ठेकेदाराचे कामाचे आठ लाख ५० हजार रुपयांचे देयक होते. हे देयक काढण्यासाठी ठेकेदाराची फाइल कनिष्ठ अभियंत्याकडून पुढे मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवणे असल्याने सईद अहमद शेख मुसा याने ठेकेदारास ४० हजार रुपये लाचेची मागणी केली.
लाच द्यायची इच्छा नसल्याने ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी तक्रारदारासोबत दोन पंच पाठवून पडताळणी केली. त्यात सईद अहमद शेख मुसा याने ४० हजार रुपयांची लाच मागितली. ३० हजार रुपयांचा पहिला हप्ता व बिल मंजुरीनंतर १० हजार रुपयांची मागणी ठेकेदारास केली व बुधवारी ३० हजार रुपयांची लाच देणे-घेणे ठरले होते. हे संभाषण ठेकेदाराकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या डिजिटल व्हाइस रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड झाले. त्यानुसार बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.
सईद अहमद शेख मुसा याने ठेकेदारास वाशीम बायपास चौकातील एका चहाच्या टपरीजवळ बोलावले व ठेकेदारांकडून ३० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सईद अहमद शेख मुसा यास रंगेहात पकडले. त्याच्याकडून लाचेची ३० हजार रुपये रक्कम जप्त केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय गोर्ले, पोलिस निरीक्षक इश्वर चव्हाण, पोलिस हवालदार गजानन दामोदर, सुनील राऊत, संतोष दहिहांडे, राहूल इंगळे, सुनील अलोने, सचिन धात्रक व प्रवीण कश्यप यांनी केली.
अधिक वाचा : अवैध दारू विक्रेत्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola