अकोला (प्रतिनिधी) : जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी सुजलाम सुफलाम अकोला अभियानातंर्गत भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने जिल्हयात मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरु झाली आहेत.
विविध दहा विभागातंर्गत सर्वच तालुक्यांत जलदगतीने कामांना सुरुवात झाली आहे. मूर्तिजापूर व पातूर तालुक्यात जलसंपदा विभागाची काही कामे पूर्ण झाली आहेत. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील व जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या या कामांमुळे भविष्यात याचे निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत.
विविध जलसंधारणाच्या कामांसाठी भारतीय जैन संघटनेने विनामुल्य जेसीबी, पोकलँड मशिन उपलब्ध करुन दिले आहेत. यासाठी डिझेलचा खर्च प्रशासन करीत आहे. विविध विभागामार्फत जिल्हयात 4 हजार 91 कामे केली जाणार आहेत. या कामाच्या माध्यमातून सुमारे 175 लक्ष घ.मी. इतके जलसंधारणाची कामे होणार आहेत. यामध्ये कपार्टमेंट बंडिंग, खोल सलग समतल चर, शेततळे, ई-क्लास शेततळे, मातीनाला/सिनाबा/गाळ काढणे, सिमेंट नाला खोलीकरण/सरळीकरण, नाला खोलीकरण, ढाळीचे बांध, वन तलाव दुरुस्ती, खोलीकरण, मातीकाम, वनतळे, पाणी खडडे, पाझर तलाव, नदया खोलीकरण, रुंदीकरण आदी कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी रु. 23 कोटी 50 लक्ष डिझेलचा खर्च अपेक्षित आहे.
साधारण जून-2019 पर्यंत कामे पूर्ण केली जाणार आहेत. सध्या विविध विभागांच्या माध्यमातून मूर्तिजापूर तालुक्यात 57, पातूर तालुक्यात 27, बार्शिटाकळी व , तेल्हारा तालुक्यात प्रत्येकी 5, बाळापूर तालुक्यात 4 व अकोला तालुक्यात 3 मोठी कामे सुरु आहेत. यापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत. ही सर्व कामे कृषी विभाग, जलसंधारण, लघुपाटबंधारे (जि.प.), सामाजिक वनीकरण, वनविभाग, जलसंपदा विभाग, वन्यजीव, महानगरपालिका, लघुपाटबंधारे विभागातंर्गत सुरु आहेत. सर्वच ठिकाणी कामांना वेग आला असून मुदतीच्या आता कामे पूर्ण केली जाणार आहेत. सुपीक जमीनींसाठी शेतकऱ्यांना विनामुल्य गाळही दिला जाणार आहे.
सुजलाम सुफलाम अंतर्गत सुरु असणाऱ्या जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकरी (रोहयो) अशोक अमानकर तर समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हा जलसंधारण अधिकारी श्यामकांत बोके हे आहेत. कामांची प्रगती, अडचणींबाबत आठवडयातून एकदा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाते. कामे नियोजनबध्दपणे व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्येक तालुक्यांत लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ, तलाठी, ग्रामसेवक यांच्या कार्यशाळाही घेण्यात येत आहेत. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या कामांमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अधिक वाचा : जिल्हयातील महत्त्वांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्हीसीव्दारे घेतला आढावा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola