अकोला (प्रतिनिधी) : मीटरनुसार पाणीपट्टी न आकारता चुकीचे देयक दिल्याच्या अनेक तक्रारींची महापौरांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी अशाच एका तक्रारीची शहानिशा करण्यासाठी स्वत: नागरिकाचे घर गाठले आणि नळमीटरची तपासणी केली.
केलेल्या तपासणीनंतर तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले. तातडीने अधिकाऱ्यांची कानउघाडणी करीत बिलाची रक्कम कमी करून दिली आणि संबंधित नागरिकाला दिलासा मिळाला. महापौर विजय अग्रवाल यांनी घेतलेल्या या भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे तर प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. मीटरनुसार पाणीपट्टी आकारली जात नसल्याच्या अनेक तक्रारी महापौर कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत.
या तक्रारींची शहानिशा करण्याकरिता महापौर विजय अग्रवाल यांनी अचानक राधाकिसन प्लॉट येथे जाऊन नळमीटर आणि दिलेल्या बिलाची तपासणी केली. नागरिकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले. अधिकाऱ्यांना तेथेच खडसावले आणि देयकात तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. यावेळीअभियंता व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन, यापुढेअसा प्रकार घडल्यास कडक कारवाई केलीजाईल, असा इशारा महापौर विजय अग्रवाल यांनी यावेळी दिला.
अधिक वाचा :थकीत कर न भरणाऱ्या नागरिकाची मालमत्ता सील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola