अकोला (प्रतिनिधी) : सुमारे ९ वर्षांपासून मालमत्ता कर थकीत असलेल्या आणि वेळोवेळी नोटीस देऊनही त्याचा भरणा न करणाऱ्या नागरिकाची मालमत्ता मनपाच्या जप्ती पथकाने सील केली.
मोबीन अहमद असे संबंधित नागरिकाचे नाव असून ते आझाद कॉलनी येथील रहिवासी आहेत. मोबीन अहमदयांच्याकडे सन 2010 पासून ते 2019 पर्यंत 71,272/- मालमत्ताकर थकित आहे. त्यांना थकित कराचा भरणा करण्या संदर्भात मनपा प्रशानाकडून वारंवार सूचना व नोटीस दिल्यावरही त्यांनी कराचा भरणा केला नाही. त्यामुळे मनपा उपआयुक्त यांच्या आदेशान्वये व कर अधीक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात मोबीन अहमद यांची मालमत्ता सील करण्यात आली.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी थकित मालमत्ता कराचा भरणा वेळेवर करून सील व जप्तीसारखीअप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ही कारवाई जप्ती पथक प्रमुख सै.मुमताज अली, सहायक कर अधीक्षक प्रशांत बोळे,कर वसुली लिपिक गोपाल लोखंडे,गणेश चव्हाण, प्रकाश कपले, मोहन घाटोळ,सुरक्षा रक्षक श्रावण वाहाने, शोभा पांडे,तायडे यांच्या पथकाने केली.
अधिक वाचा : जिल्हयातील महत्त्वांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्हीसीव्दारे घेतला आढावा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola