अकोला (प्रतिनिधी): डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताचे औषधे मिळत नाहीत. मात्र अवैधरीत्या गर्भपाताचे औषधे विकणाऱ्या रॅकेटचा गुरुवारी पर्दाफाश करण्यात आला. पोलिस-आरोग्य विभाग व अन्न औषध विभागाने बनावट ग्राहक बनवून पाठवलेल्या एका महिलेला ४३३.९० रुपये किमतीच्या पाच गर्भपाताच्या गोळ्या ४ हजार रुपयांत विकताना संध्या नामक महिलेला रंगेहात पकडले. तसेच तिला औषधे पुरवणाऱ्या तोतयालाही पोलिसांनी पकडले.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे एक तक्रार प्राप्त झाली. त्यात म्हटले होते की, शहरात गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत आहे. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांच्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासन विभागात एक बैठक झाली. यावेळी कारवाई करताना पोलिसांना सोबत घेण्यावर एकमत झाले व त्यांनी गुरुवारी दुपारी सापळा रचला. यावेळी पोलिसांनी एका महिलेला ग्राहक म्हणून समोर केले. या महिलेने संध्या नामक महिलेला फोन केला व मला गर्भपात करायचा आहे. त्यासाठी गोळ्या पाहिजेत म्हटले. त्यानंतर संध्याने महिलेने बसस्थानकावर गोळ्या घेऊन येतो म्हणून सांगितले. ठरल्याप्रमाणे संध्या गोळ्या घेऊन आली, तिने चार हजार रुपये घेतले आणि पाच गोळ्या असलेली स्ट्रिप महिलेला देताच दबा धरून बसलेल्यांनी संध्याला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्या घराची झडती घेतली असता तिच्या घरातून गर्भपातासाठी लागणारे औषधे, हॅन्डग्लोज, सिरीज आणि इतर काही औषधे दिसून आली. पोलिसांनी ते जप्त करून महिलेला व औषध पुरवणारा संजू जैन यास ताब्यात घेतले. ही कारवाई आरोग्य विभागाचे डॉ. मिना शिवाल, गजानन चव्हाण, अंकुश गंगाघाटकर, अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी हेमंत मेतकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या पथकाने केली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक हेमंत मेतकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अन्न औषध मानके अधिनियम १८ (सर), २७(बी), २८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.
अधिक वाचा : एलसीबी धडाकेबाज कारवाई, ५२ हजाराची देशी विदेशी दारू जप्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola