अकोला :- ईलेक्ट्रानिक्स व्होटिंग मशिन व व्हीव्ही पॅटच्या जनजागृती व प्रशिक्षणासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे जिल्हयात जनजागृती अभियान पुढील आठवडयापासुन राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदारामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट याबाबतची माहिती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातंर्गत जिल्हा प्रशासनातर्फे गावोगावी जाऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबतची माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अकोला जिल्हयातील अकोट , बाळापूर , अकोला पश्चिम, अकोला पुर्व व मुर्तिजापूर या विधानसभा मतदार संघात एकुण 1680 मतदान केंद्र आहेत. अकोट येथे 331 , बाळापूर- 335, अकोला पश्चिम- 283, अकोला पुर्व- 350 , मुर्तिजापूर- 381 मतदान केंद्र आहेत.
ईलेक्ट्रानिक्स व्होटिंग मशिन व व्हीव्ही पॅटच्या जनजागृतीसाठी जिल्हयात प्रत्येक मतदार केंद्रासाठी 5 पथक असे एकुण 25 पथके गठीत करण्यात आली आहे. यापैकी प्रत्येक मतदार संघासाठी दोन याप्रामणे एकुण 10 पथके फिरते राहणार आहे. तसेच उपविभागीय स्तरावर एकुण 5 पथके कार्यरत राहणार आहे. तर 10 पथके राखीव राहणार आहे. जिल्हयामधील 5 विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येक फिरते पथकासोबत 25 अधिकारी कर्मचारी व 5 पोलीस कर्मचारी राहणारआहे. यासाठी 5 मतदार संघासाठी प्रत्येकी 2 याप्रमाणे 10 वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या वाहनासोबत मतदारांमध्ये जनजागृतीसाठी 2 एलसीडी संच राहणार आहे. सोबत लाऊडस्पीकरची व्यवस्था सुध्दा राहणार आहे. 5 मतदार संघातील गावोगावी जाऊन सर्व मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबतची माहिती व प्रशिक्षण प्रत्येकी 2 फिरते पथकाव्दारे मतदारांना देण्यात येणार आहे.यासाठी निवडणूक प्रशासनाने सर्व तयारी केली आहे.
अधिक वाचा : जलाशय – तलावाखालील जमिनीवर चारा पिक घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola