मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्याने अतिआनंदामुळे काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पारोळा तालुक्यातील वंजारी गावात ही घटना घडली आहे. सुरेश सुका ठाकरे (वय ७२) असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे. ते काँग्रेसचे पारोळा तालुका अध्यक्ष आहेत. निवडणूक निकालाच्या दिवशी टीव्हीवर पाच राज्यांचे निकाल पाहत असताना काँग्रेसला मिळालेल्या यशाने त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यानंतर काँग्रेसचे नेते पिरन अनुष्ठान यांनी ठाकरे यांना फोन करून विजय उत्सव साजरा करण्यासाठी पारोळा येथे येण्याचा निरोप दिला. तीन राज्यांत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्याचं ऐकत असतानाच ठाकरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांना तात्काळ धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी दुपारपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
अधिक वाचा : ११ वर्षांच्या मुलासमोरच आईची हत्या करून वडिलांनी चिरला स्वतःचा गळा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola