नवी दिल्ली : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षात देशभरातील १० कोटी ९१ लाख ४४ हजार ९८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २ कोटी २१ लाख ३८ हजार ६०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ही संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीने होणारी नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशभर २०१६ च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केल्याची माहिती कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या माहितीत पुढे आली आहे.
२०१६-१७ मध्ये १ कोटी २० लाख नोंदणी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची खरीप हंगाम २०१६ मध्ये सुरुवात झाली. यावेळी राज्यातील १ कोटी ९ लाख ९७ हजार ३९८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. याच हंगामात देशभरातील २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील एकूण ४ कोटी २ लाख ५८ हजार ७३७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.
२०१६-१७ च्या रब्बी हंगामात राज्यातील १० लाख ८ हजार ५३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तर याच हंगामात देशातील एकूण १ कोटी ७० लाख ५६ हजार ९१६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. महाराष्ट्रात २०१६ खरीप आणि २०१६-१७ च्या रबी हंगामात एकूण १ कोटी २० लाख ५ हजार ९३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली .
२०१७-१८ मध्ये १ कोटी १ लाख नोंदणी
राज्यात २०१७ खरीप आणि २०१७-१८ च्या रबी हंगामात एकूण १ कोटी १ लाख ३२ हजार ६७७ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली होती. २०१७ च्या खरीप हंगामात राज्यातील ८७ लाख ६८ हजार २११ शेतकऱ्यांनी नोंदणी केली तर देशभरातील २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील एकूण ३ कोटी ४७ लाख ७६ हजार ५५ शेतकऱ्यांनी या हंगामात नोंदणी केली. २०१७-१८ च्या रबी हंगामात राज्यातील १३ लाख ६४ हजार ४६६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तर याच हंगामात देशातील एकूण १ कोटी ७० लाख ५३ हजार २७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.
अधिक वाचा : Farmers Protest in Delhi: २०१९ मध्ये देशाचा पंतप्रधान शेतकरी असेल: राजू शेट्टी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola