तेल्हारा(प्रतिनिधी)- शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीला आळा बसला होता मात्र आता पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले एका युवकावर अचानक लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरात दि १० डिसेंबर रोजी घडली.
शहरातील शेगाव नाका स्थित एका पानपट्टी जवळ अनिकेत मिरगे हा युवक आपल्या मित्रा सोबत उभा असतांना अचानक आरोपी गणेश आमले नामक युवकांने पाठीमागून येऊन अनिकेत मिरगे याच्या पाठीवर व डाव्या हातावर लोखंडी रॉड ने वार करून गंभीर जखमी केले यामध्ये अनिकेत मिरगे बेशुद्ध पडला.यावेळी जवळच असलेल्या काही मित्रांनी गणेश याचा पाठलाग केला असता तो पळून गेला.अनिकेत याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अकोला येथे खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहे.काल तेल्हारा पोलीस ठाण्यात आरोपी गणेश आमले विरुद्ध कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ला अद्याप अटक करन्यात आली नाही.पुढील तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ गणपत गवळी,पो कॉ खडसे करीत आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola