अकोला (प्रतिनिधी) : राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी सकाळी जुने शहरातील गुलजारपुरात छापा टाकला. त्यात त्यांनी वाह, विमल व पानबहार गुटख्याचा साठा जप्त केला.
अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी सोमवारी सकाळी सहायक आयुक्त एल.जी. राठोड यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे व गजानन गोरे यांनी गुलजारपुऱ्यातील शामसुंदर बैजनाथ भरतीया याच्या गोडावूनवर छापा टाकला. येथे त्यांना राज्यात प्रतिबंधित असलेला विविध कंपन्यांचा ८७ हजार ८५० रुपयाचा गुटखा आढळून आला.
या गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त करून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या कारवाईने गुटखा माफियांनी धास्ती घेतली. यापूर्वीही अकोल्यात असताना अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांनी धडाकेबाज कारवाया केल्या आहेत.
अधिक वाचा : प्रहार जनशक्ती पक्षाने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केले ठिय्या आंदोलन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola