लंडन : भारतातील विविध बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पसार झालेला विजय मल्ल्या अखेर भारताच्या तावडीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. किंगफिशरचा सर्वेसर्वा, मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणास आज लंडनमधील कोर्टाने परवानगी दिली. भारताच्या प्रयत्नांना मिळालेलं हे फार मोठं यश असल्याचं मानलं जात आहे.
न्यायालयाच्या निर्णयावर सीबीआय प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्ही लवकरात लवकर मल्ल्याला परत आणू याबद्दल सकारात्मक आहोत. सीबीआयचे आपलं सामर्थ्य आहे. आम्ही या प्रकरणावर खूप मेहनत घेतली आहे. प्रत्यार्पणासाठी पुरावे सादर करताना आम्हाला आत्मविश्वास होता असं म्हटलं आहे.
न्यायालयात जाण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘मी आधीही बँकांचं कर्ज फेडण्यासंबंधी बोललो होतो. कर्ज फेडण्याच्या माझ्या वक्तव्याचं प्रत्यार्पणाशी काही देणं घेणं नाही’, असं म्हटलं होतं. आपण कर्ज फेडण्याची दाखवलेली तयारी बनावट नव्हती असंही तो म्हणाला होता.
अधिक वाचा : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola