नवी दिल्ली – भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा सोमवारी राजीनामा दिला. सरकारसोबत सुरू असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच सरकार आणि आरबीआय गव्हर्नरमध्ये वाद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा देखील उडाल्या. यानंतर सरकार आणि उर्जित पटेल यांच्यातील वाद मिटले होते. तरीही, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी या निर्णयामागे वैयक्तिक कारणे असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले उर्जित पटेल –
ते म्हणाले, “वैयक्तिक कारणांमुळे मी आपल्या विद्यमान पदाचा तत्काळ राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदी काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. आरबीआयच्या स्टाफने केलेले सहकार्य आणि हार्डवर्कने आरबीआयने यश शिखरे गाठली. आरबीआयचे सर्वच कर्मचारी, अधिकारी आणि संचालकांना धन्यवाद आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा”
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola