अकोला : भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला महानगर पुर्व पश्चिम ची बैठक शहरातील अशोक वाटिका येथे सम्यकचे अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळेस शहरातील बहुसंख्य प्रमाणात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.यावेळेस सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला महानगर पुर्व पश्चिम मध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यामध्ये –
महानगर पश्चिम – संघटक पदि योगेश हिरळकर, प्रसिद्धी प्रमुख सुरज अहिर,उपाध्यक्ष प्रशिक तायडे व सुरज जामनिक यांची निवड करण्यात आली.
महानगर पुर्व – संघटक पदि शोएब खान,विजय मानकर,प्रसिद्धी प्रमुख रौनक वानखडे,उपाध्यक्ष अक्षय धवने,रोहन वानखडे,तुषार सोनोन,जयंत सदाफुले, सहसचिव शुभम वानखडे,शुभम पवार,साहिल आठवले यांची निवड जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाट यांच्या आदेशाने महानगर अध्यक्ष(पुर्व)आकाश गवई व महानगर अध्यक्ष (पश्चिम)धिरज इंगळे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी सम्यकचे जिल्हा सहसचिव विकेश जगताप,महानगर महासचिव(प) पवन गवई,महासचिव (पु) अक्षय डोंगरे, उपाध्यक्ष शेखर इंगळे,बंटी क्षिरसागर,सहसचिव अक्षय गोपणारायन,लकि वानखडे,प्रशिक सदांशिव,अतुल रोटे,विनोद वाकोडे,योगेश गोंगटे, अंकुश धुरंदर,अंकित इंगळे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन पवन गवई व आभार अक्षय डोंगरे यांनी मानले.
अधिक वाचा : जननी 2 उपक्रमा अंतर्गत येणाऱ्या स्वास टीम ची आढावा बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola