अकोला (निलेश किरतकार)- जिल्ह्यातील पातूर आणि बाळापूर तालुका हा दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आला आहे.नुकताच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या जीआर नुसार जिल्ह्यातील 5 तालुक्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कडून मोफत पास सवलत योजना लागू करण्यात आली आहे. परंतु अकोट आणि पातूर तालुका दुष्काळग्रस्त नसल्यामुळे ही योजना अकोट आणि पातूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना लागू होऊ शकली नाही. या तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही मोफत पास मिळाव्यात, या मागणी करिता आज विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेला पालकमंत्र्यांचा जनता दरबार गाठला. व यावेळी पातूर तालुक्यातील सर्व महाविद्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास देण्यात याव्या, या मागणीचे निवेदन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना देण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांशी विद्यार्थ्यांनी सविस्तर चर्चा केली.या चर्चेला रिपब्लिकन विद्यार्थी परिषद अकोलाचे जिल्हा संघटक आकाश हिवराळे, महेश कचाले, नागेश ताले,अंकूश अंभोरे, इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते. येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्या, अन्यथा तीव्र निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात येईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
व्हिडिओ : प्रतिभावंत खेळाळूनां चालना देण्यासाठी CM चषकाचे आयोजन – खा संजय धोत्रे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola