भारताने ऑस्ट्रेलियातील चार कसोटी मालिकेत ॲडलेड येथील पहिली कसोटी जिंकत १-० अशी आघाडी घेतली आहे. या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव केला. भारताचा हा ऐतिहासिक विजय आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताने तसेच भारतीय संघातील काही खेळाडूंनी विक्रमही केले आहेत. त्यामुळे ऐतिहासिक विजयाबरोबरच हा सामना विक्रमीही ठरला.
पाचव्या दिवशी भारत ऑस्ट्रेलियाचा सहज पराभव करेल असे वाटत असताना कांगारुंच्या शेपटाने १५० धावा करत चांगलाच घाम फोडला. पण, अखेर अश्विनने जोस हेजलवूडला बाद करत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात अश्विन, पंत आणि भारतीय संघाच्या नावावर काही विक्रमांची नोंद झाली आहे.
अश्विनने या कसोटीत त्याच्या कारकिर्दीतील सर्वात जास्त षटके टाकली. त्याने ८६.५ षटके टकली. अश्विनने या सामन्यात दोन्ही डावात मिळून ६ बळी घेतले. ही आश्विनची ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम कामगिरी आहे. या आधी अश्विनने मेलबर्नच्या एमसीजीवर २०९ धावा देत ५ बळी मिळवले होते.
भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतनेही या कसोटीत आपल्या नावावर विक्रम नोंदवला. त्याने एबी डिव्हिलियर्स आणि जे रसेल यांच्या एका कसोटी सामन्यात ११ विकेटमध्ये योगदान देण्याचा विक्रमाशी बरोबरी केली. त्याने भारताच्या वृध्दीमान साहाचा एका कसोटी सामन्यात १० विकेटमध्ये योगदान देण्याचा विक्रम मोडला.
या सामन्यातला भारताचा ३१ धावांचा विजय हा भारताचा तिसरा सर्वात कमी धावांनी मिळवलेला निसटता विजय आहे. याआधी २००४ मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी, कोलकात्यात १९७२-७३ इंग्लंडविरुध्द २८ धावांनी विजय मिळवला होता.
भारत ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत पहिली कसोटी जिंकणारा हा दुसरा आशियाई संघ ठरला आहे. या आधी पाकिस्तानने १९७८-७९ मध्ये मेलबर्न येथील कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
१९६८ ला न्यूझीलंड मध्ये भारताने ३ कसोटी सामने जिंकले होते. त्यानंतर भारताने आजची कसोटी जिंकत आशियाबाहेर एका वर्षात ३ कसोटी जिंकल्या.
२०१८ मध्ये भारताने भारताबाहेर ज्या तीन कसोटी जिंकल्या आहेत. त्या तीन कसोटीच्या दोन्ही डावात ५० च्या वर धावा करणारा पुजरा हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने जोहान्सबर्ग कसोटीत ५० आणि १७९ धावा, ट्रेंट ब्रिज कसोटीत ७२ आणि २०८ धावा आणि ॲडलेड येथील कसोटीत १२३ आणि ७१ धावा केल्या आहेत.
अधिक वाचा : चेतेश्वर पुजारा ठरला ५ हजार धावा करणारा भारताचा बारावा खेळाडू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola