दिल्ली : राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे (आरएसएलपी) अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी मानव संसाधन मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनही कुशवाह बाहेर पडण्याची औपचारिक घोषणा कुशवाह करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
२०१४मध्ये उपेंद्र कुशवाह यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यानंतर त्यांना राज्यमंत्रिपदही देण्यात आलं होतं. पण २०१९मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये दोनहून जास्त जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण भाजपने दोनहून जास्त जागा कुशवाह यांना देण्यास नकार दिला होता. बिहारमधील ४० पैकी १८-१८ जागा लढवण्याचा निर्णय भाजप आणि जेडीयूने घेतला आहे. यामुळे कुशवाह यांना फक्त दोन जागा देण्यात येण्याची चर्चा होती. कुशवाह यांनी या गोष्टीचा विरोध केला आहे. रविवारी झालेल्या रालोआच्या बैठकीतही कुशवाह यांनी हजेरी लावली नव्हती.
अधिक वाचा : लोकसभा २०१९ निवडणूक लढणार नाही: सुषमा स्वराज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola