हिवरखेड (प्रतिनिधी) : अकोट विधानसभा मतदार संघात येत असलेल्या हिवरखेड ते अडगाव, अकोट तसेच हिवरखेड – बेलखेड, तेल्हारा या रस्त्याच्या कामांचा फ़्क़्त भूमिपूजन सोहळा होत आहे. प्रत्यक्ष कामाला सुरवात नाही. य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यांचे प्रत्यक्ष काम सुरु होण्यासाठी १० डिसेंबर ला एक दिवसीय जेलभरो आंदोलन स्थानिक भाजपा वगळता सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ करणार असल्याची माहिती ६ डिसेंबर रोजी हिवरखेड ग्रामपंचायतीचे विरोधी पक्षनेते श्यामशील भोपळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले कि, १० डिसेंबर सोमवार रोजी अकोल्यात जनता दरबारदिनी हिवरखेड परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिलांसह पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील व अकोट चे आमदार प्रकाश भारसाकळे यांना गळ्यातील बँडेज पट्टा , मानेचा, कमरेचा पट्टा या भागिल खराब रस्त्यामुळे ज्यांचे मणके गेले त्यांच्या वतीने पट्टे भेट देण्यात येईल.
या आंदोलनाला स्थानिक कॉंग्रेस तर्फे उमेश टापरे, स्थानिक शिवसेना शाखेचे अर्जुन गावंडे, भारिप-बमस बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश खोब्रागडे आदी कार्यकर्त्यांचा सहभाग राहील, असेही भोपळे यांनी स्पष्ट केले.
हिवरखेड हे अकोला जिल्ह्यातील राजकीय घडामोडीचे महत्वपूर्ण मोठे गाव असून, परिसरातील अतिशय खराब रस्त्यासाठी ग्रामस्थ जेल मध्ये जाण्यासाठी सुद्धा माझ्या नेतृत्वात तयार आहेत, असेही भोपळे यांनी सांगितले.
व्हिडिओ : अकोल्यासह जिल्ह्याभरात महापरिनिर्वाण दिनानिमित्य महामानवाला अभिवादन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola