अॅडलेड : कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा ने आज आपल्या कसोटी कारकिर्दीत ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
कसोटीमध्ये अशी कामगिरी करणारा पुजारा हा भारताचा १२ वा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात १२३ धावांची झुंजार खेळी करत त्याने हा पराक्रम केला आहे.
पुजाराने ६५ कसोटी सामन्यांमध्ये १०८ डावात ५०.२८ च्या सरासरीने ५०२८ धावा केल्या आहेत. यात १६ शतके, ३ द्विशतके आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे. सध्याच्या भारतीय संघात कसोटी क्रिकेटमध्ये पुजारापेक्षा जास्त धावा या फक्त विराट कोहलीच्या ( ६३३४ धावा) नावावर आहेत. तर भारताच्या तीन खेळाडूंच्या नावावर १० हजारपेक्षा जास्त धावा जमा आहेत. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहूल द्रविड आणि सुनील गावस्कर यांचा समावेश आहे.
पाच हजार धावा करणारे भारताचे बारा खेळाडू
सचिन तेंडुलकर
राहूल द्रविड
सुनील गावस्कर
व्ही.व्ही.एस लक्ष्मण
विरेंद्र सेहवाग
सौरव गांगुली
दिलीप वेंगसरकर
विराट कोहली
मोहम्मद अझरुद्दीन
गुंडप्पा विश्वनाथ
कपिल देव
चेतेश्वर पुजारा
अधिक वाचा : ICC T20I Rankings : कुलदीप यादव ‘टॉप ५’ मध्ये
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola