अकोला (प्रतिनिधी) : अकोला महानगरपालिका मालमत्ता जप्ती पथकाने थकीत करापोटी शहरातील कपडा बाजार येथील नागरमल शर्मा यांची मालमत्ता सील केली.
त्यांच्याकडे 1 एप्रिल 2011 पासून 42806/- मालमत्ताकर थकित आहे. त्यांना थकित कराचा भरणा करण्यासंदर्भात मनपा प्रशासनाकडून वारंवार सूचना व नोटीस दिल्यावरही त्यांनी कराचा भरणा केला नाही. त्यामुळे मनपा आयुक्त यांच्या आदेषान्वये व कर अधीक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात नागरमल शर्मा यांची मालमत्ता सील करण्यात आली.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी थकित मालमत्ता कराचा भरणा वेळेवर करून सील व जप्ती सारख्या अप्रिय कारवाई टाळावे, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई जप्ती पथक प्रमुख सै.मुमताज अली, सहायक कर अधीक्षक गजानन घोंगे, संतोष सूर्यवंशी, संतोष गाडेकर, प्रकाश कपले, मोहन घाटोळ, सुरक्षा रक्षक श्रावण वाहाने, शोभा पांडे आदींच्या पथकाने केली.
अधिक वाचा : सेवा निवृत्त जवानाचा शिर्डीत गोळीबार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola