अकोट(प्रतिनिधी)- अकोट येथे नव्याने रुजू झालेले अकोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईचा सपाटा लावलेला असतांना आज ठाणेदार महल्ले यांनी शहरातील अवैध वाहतूक करणाऱ्या शेकडो वाहतूकदाराविरुद्ध कारवाई करून सर्व वाहने शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आले होते.ठाणेदार महल्ले यांनी रुजू होताच अवैध धंद्यांविरुद्ध कारवाया,अवैध वाहतूक यांना वठणीवर आणण्याचे काम हाती घेतले आहे.त्यामुळे ठाणेदार महल्ले यांची एन्ट्री दमदार ठरली आहे.असे बोलल्या जात आहे.
सदर कारवाई ठाणेदार संतोष महल्ले यांचे नेतृत्वात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकविरुद्ध धडक मोहीम पोहेकॉ जगदीपसिंह ठाकूर ,पोकॉ गणेश फोकमारे, पोकॉ अनिल लाफुरकर, पोहेकॉ गोवर्धन सिरसाट यांनी केली