अडगाव बु(गणेश बुटे)-तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु येथील आश्रम शाळेजवळ आज दुपारी ४.३० वाजतेच्या दरम्यान ट्रॅक्टर चालकाचा विचित्र असा मृत्यू झाल्याची घटना घडली.
अडगाव बु येथील आश्रम शाळेजवळ दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान विचित्र असा मृत्यू झाल्याची घटना घडली यामध्ये ट्रॅक्टर चालक हा एका शेतात मृत्यूमुखी पडलेला आढळला तर ट्रॅक्टर हा दोनशे फूट अंतरावर जाऊन झुडपामध्ये उभा दिसला.ट्रॅक्टर चालक सुनील मनोहर अढाऊ रा चण्डिकापूर हा एक शेतात मृत अवस्थेत आढळुन आल्याने एकच खलबळ उडाली होती विचित्र असा मृत्यू झाल्याने बघ्याची एकच गर्दी झाली होती. तर घटनास्थळी पोलीस पोहचले असता ते सुद्धा चक्रावले होते की नेमका ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू कसा झाला ट्रॅक्टर दोनशे फूट अंतरावर तर मृतदेह येथे कसा त्यामुळे गावकऱ्यांकडून घटनास्थळी तर्कवितर्क लावण्यात येत होते पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola