नवी दिल्ली : ग्राहकांना अनेकदा सरकारी दस्तऐवज मिळवण्यासाठी दीर्घ कालावधीचा विलंब करावा लागतो. मात्र, सरकारने याची दखल घेत करदात्यांना आनंदाची वार्ता दिली आहे. आता अवघ्या चार तासात पॅनकार्ड मिळणार आहे.
पॅनकार्ड मिळवण्यासाठी १५ दिवसांची वाट पाहावी लागत होती, पण आता तसे होणार नाही. आता आपण अर्ज केल्यानंतर अवघ्या चार तासांमध्ये पॅनकार्ड देण्यासाठी आयकर विभागाने नवी प्रणाली अस्तित्वात आणली आहे. मात्र, यासाठी वर्षभरात यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष सुशील चंद्र यांनी दिली आहे.
पॅनकार्डबाबत ते पुढे म्हणाले, की पॅनकार्डसाठी तुम्हाला आधार क्रमांक द्यावा लागेल आणि ओळख पटवून झाल्यावर चार तासांच्या अवधीमध्ये ई पॅन दिले जाईल. यासाठी वर्षभरात यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षांत, वस्तू आणि सेवा करातून अपेक्षेपेक्षा कमी महसूल येणार असला तरी, प्रत्यक्ष कराचे ११.५ लाख कोटी रुपयांचे लक्ष्य गाठले जाईल, असा विश्वास चंद्र यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी नोटबंदीचा फायदा झाला असल्याचे व्यक्त केले आहे.
कर निर्धारण वर्ष २०१८-१९ मध्ये प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांची संख्येत तब्बल ५० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे दिसून येत असून, एकूण ६.०८ कोटी विवरणपत्रे करदात्यांनी भरल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष कर महसुलात १६.५ टक्क्यांचा वृद्धिदर तर एकंदर कर महसुलात १४.५ टक्के दराने वाढ दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कोणी परदेशी नागरिक स्वतःच्या संपत्तीसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यास टाळत असल्यास त्याच्याविरूद्ध कारवाई केली जाणार असल्याचे सीबीडीटीने सांगीतले आहे.
अधिक वाचा : SBI ग्राहकांसाठी खुषखबर; आता करा मोफत अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola