जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनं हल्ला केलानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘यहीं मौका है उनके दिल मे डर बिठाने का’, ‘ये हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा’ ‘ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर मे घुसेगा भी और मारेगा भी’ असे एकापेक्षा एका दमदार संवाद या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. आदित्य धार यांनी उरी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून विकी कौशल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. विकीसोबतच यामी गौतम परेश रावलदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
Yeh naya Hindustan hai! #URItrailer out now! https://t.co/WuvGoPN07N @yamigautam @SirPareshRawal @AdityaDharFilms @RonnieScrewvala @RSVPMovies pic.twitter.com/gEs40ru1SS
— Vicky Kaushal (@vickykaushal09) December 5, 2018
दि. १८ सप्टेंबर २०१६ मध्ये उरीतील लष्करी कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ११ दिवसांनी लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पीओकेत घुसून दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त केली होती. या हल्ल्यात अनेक दहशतवादी प्रशिक्षणाचे तळ नष्ट करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले सर्व जवान नंतर सुरक्षितपणे भारतात परतले होते. या अकरा दिवसांत नेमकं काय घडलं हे चित्रपटातून संपूर्ण भारतीयांना पाहायाला मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य धार यांनी दिली. ११ जानेवारी २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अधिक वाचा : ‘झीरो’ चित्रपटातील ‘इशकबाजी’ गाणे रिलीज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola