अकोला : ‘रोजगारक्षम शेती व्यवसाय’ या सदराखाली ‘शेतकरी हा स्मार्ट उदयोजक’ हा उपक्रम जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन राबविणार आहे. त्या अनुषंगाने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता अकोला जिल्हयातील शेतकरी / बचतगट / FPO यांची कार्यशाळा बुधवार, दि. 5 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 12.00 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आयोजीत करण्यात आली आहे.
शेतीला पुरक व्यवसायाची जोड दिल्यास शेती फायदेशीर ठरते, ही बाब डोळयासमोर ठेवून मा. प्रधानमंत्री व मा. मुख्यमंत्री यांची अतिशय महत्वाकांक्षी योजना म्हणजे कमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरून करता येणारा शेती पुरक व्यवसाय सुरू करण्याबाबत, शेतक-यांमध्ये जनजागृती करण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने अकोला जिल्हयात रोजगारक्षम शेती व्यवसाय या उपक्रमाखाली शेतकरी हा स्मार्ट उदयोजक हा अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरवीले आहे.
हे अभियान जिल्हयात यशस्वीपणे राबविण्याकरीता अकोला जिल्हयातील शेतक-यांनाकरिता प्रत्येक बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून साप्ताहिक मुक्त कार्यशाळा आयोजीत करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेमध्ये अकोला जिल्हयातील प्रगतीशील शेतकरी यांच्या सोबत संवादाने तसेच कुक्कूटपालन, शेळी मेंढीपालन अशा शेतीपुरक व्यवसाय करणा-या प्रगतीशील शेतक-यासोबत संवाद साधणे व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच सदर अभियाना अंतर्गत उक्त कार्यशाळेमध्ये शेती पुरक व्यवसाय सुरू करणऱ्या शेतकऱ्यांकरिता शासनाच्या विविध योजनांबाबतची माहिती देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेस शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर यांनी केले आहे.
अधिक वाचा : बाळापूर तालुक्यात रिलायन्स कॅन्सर केअर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola