पातूर(सुनिल गाडगे) : पातूर शहरात घरगुती वादातून चक्क बापानेच पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.. तर याच घटनेत मारेकऱ्याची आई व पुतणी गंभीर जखमी झाली.
घरघुती वादातून गोपाल शंकर बेलूरकर रा.खानापूर ह. मु.गहिलोत नगर पातूर या बापानेच पोटच्या मयुरी गोपाल बेलूरकर या आपल्या स्वतःच्या मुलीची गळा आवळुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मयुरी गोपाल बेलूलकर असं हत्या करण्यात आलेल्या ३ वर्षीय चिमुकलीचं नाव आहे. तर गोपाल शंकर बेलूलकर(वय 30) असं मारेकरी बापाचं नाव आहे. याच दरम्यान आरोपी गोपाल याने स्वत:ची आई शकुंतला शंकर बेलूलकर व पुतणी गायत्री बाबुराव बेलूरकर हिला देखील मारहाण केली. या मारहाणीत शकुंतला व पुतणी गायत्री हे दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हि घटना सोमवारी रात्री उशिरा 3 वाजताच्या सुमारास अर्थात आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
सदर घटना घडत असतांना शेजारींनी मध्यस्थी करुन घटनेची माहिती पोलीसांना दिली असता पातूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मारेकरी गोपाल बेलूलकर याला अटक केली. घटनेचं नेमकं कारण अद्याप पर्यंत माहिती नसल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. गायत्री बेलूलकर हे खानापूर येथील रहिवासी असून ती शिक्षणासाठी पातूर येथील काका मारेकरी गोपाल यांच्याकडे राहत होती.
पातुर पोलीसांनी घटनेचा पंचनामा करुन आरोपी गोपाल यास अटक करुन कलम 301, 307, भांदवि 324 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पातुर पोलीस करत आहेत.
अधिक वाचा : तरुण प्रेयसीवर प्राणघातक हल्ला करून ५० वर्षीय प्रियकराची आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola