अकोट (मनीष वानखडे) – आज शिवसेनेने विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते,संपर्क प्रमुख खा.अरविंद सावंत,आ.गोपिकीशन बाजोरिया, सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन बाप्पू देशमुख, मा.आ.संजय गावंडे, महिला आघाडी संपर्क संघटिका सौ.मधुराताई देसाई,प्रा.सौ.मायाताई म्हैसने, विधानसभा संपर्क प्रमुख भास्करजी ठाकूर, युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहरातील विविध पाणी समस्यांबाबत अकोट जीवन प्राधिकरण विभागाला शिवसेना गटनेता तथा पाणीपुरवठा सभापती अभिजित उर्फ मनिष रामाभाऊ कराळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
आकोट शहरातील नागरीकांना २००६ ते २०१६ या वर्षात जे पाणी बिल नळातून पाणी आलेच नाही तरी देण्यात आले ते लाखो रुपयांचे बिले व्याजासहित सर्वसामान्य जनतेवर लादण्यात आले आहे. बिल नागरिकांनी का भरावे?या विरोधात शिवसेना जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात आकोट शिवसेना ही शहरातील नागरीकांच्या पाठीशी उभी आहे.तसेच आजही अनेक भागात जिवन प्राधीकरणाच्या पाईपलाईन नाहीत यासाठी निधी नाही त्यामुळे या भागातील नागरीकांना दररोज पाणी समस्या होत आहे.याला जबाबदार कोण हे जिवण प्राधीकरणाच्या अधीकार्यांनी स्पष्ट करावे आज रोजी शहरातील नागरीकांकडे पाणी बिगर मशिनचे येत नसल्यामुळे मिटर नाही त्यामुळे मिटर रिडींग घेतल्या जात नाही.तरी बेहिशेबी मनमानी पध्दतीने नागरीकांना अव्याढव्य पाण्याचे बिल देण्यात येते.आपण जसे मिटर असणार्यांना बिल देता तसे सर्व नागरीकांना एकच रेटमधे बिल देण्यात यावे.
कारण पुढे मार्च अखेरीस जिवन प्राधीकरणाची वसुली सुरु होईल त्यामध्ये आधीच जिवन प्राधीकरणाने शहरातील नागरीकांना वसुलीच्या नोटीस बजावल्या आहेत की बिल भरले नाही त पाणी पुरवठा खंडीत करण्यात येईल.पण लाखोचे बिल आज तरी नागरीकांना भरणे शक्य नाही यामुळे जिवन प्राधीकरण अधीकारी व नागरीकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. हे होवू नये व शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाने याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.तसेच पाणीपुरठ्याबाबत ज्या शहरातील इतर समस्या आहेत त्या त्वरित निकाली काढाव्या या आशयाचे निवेदन शेकडो शिवसैनिक युवासैनिक तसेच महिला आघाडीच्या सदस्यांनी पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर केले.व सविस्तर चर्चा केली त्यावर पाणीपुरवठा अधिकारी यांनी अकोट नगरपालिका यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करून सर्व मागण्यांचे निराकरण करू असे सांगितले.यावर मनिष कराळे यांनी जर मागण्या मान्य झाल्या नाही तर शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन छेडु व वेळ पडल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करू असे प्रतिपादन केले.
अधिक वाचा : अकोट फैल मस्तान चौक येथे सामाजिक एकतेचा संदेश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola