मूर्तिजापूर- तालुक्यातील ग्राम हिरपुर येथे शंकरराव ठाकरे यांच्या गोठ्याला रविवारी दोन डिसेंबरला रात्री लागलेल्या आगीने लाखो रुपयांचे नुकसान झाले या आगीत एस टेन टाटा कंपनीची चार चाकी पूर्णपणे जळून खाक झाली. तर गाय, बैल गोरे अशी जनावरे जखमी झाले.
गोठ्यातील कुटार व इतर साहित्य यांनी पेट घेतल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले आणि आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या गुरांनी जोरदार आरडाओरडा केल्यानंतर शेजारीच राहणारे अभिजित गावंडे यांना जाग आली असता त्यांना शेजारी गोठ्याला आग लागल्याचे दिसले. त्यांनी घरमालकास याची कल्पना दिली. त्यांना तत्काळ झोपेतून उठवले.तर सोनुले यांनी पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. गावामध्ये अग्निशमन गाडी आली असता अतिक्रमणामुळे गाडी घटनास्थळापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यानंतर गावातील दिलीप तिहीले ,अंकुश धांडे, दत्ता गावंडे, आशिष तिहीले, ज्ञानेश्वर येवतकर, प्रफुल गावंडे यासह इतरांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये गाय. गोरा आणि बैलजोडी जखमी झाले. घटनास्थळी पोलिसांनी रात्रीच भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पटवारी पांगारकर यांनी पंचनामा केला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याचे गावात बोलल्या जात होते.
अधिक वाचा : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola