अकोला (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ सर्वेक्षण–२०१९ अंतर्गत अकोला महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने न्यू बस स्थानक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी नगरसेवक सर्वश्री हरिष आलीमचंदानी, अजय शर्मा, नगरसेविका उषाताई विरक, जानव्हीताई डोंगरे, मनपा उपायुक्त सुमंत मोरे, सहायक आयुक्त डॉ.दिपाली भोसले, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, आगार व्यवस्थापक रामेश्वर येवले. आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्येष्ठ नगरसेवक हरिषभाई आलीमचंदानी यांनी शहरातील नागरिकांना आपल्या घरात व प्रतिष्ठानातून निघणारा ओला व सुका कचरा इतरत्र न टाकता मनपाच्या कचरा घंटा गाड्यांमध्येच टाकून आपला परिसर व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या मोहिमेत आगाराचे अरविंद पिसोळे. ज्ञानेश्वर गव्हाळे, आर्ट ऑफ लिव्हींगचे कपिल ठक्कर, मनपा आरोग्य निरीक्षक किरण खंडारे, सूरज खेडकर, प्रशांत जाधव, निखिल कपले, शुभम पुंड, विशाखा घोडेस्वार, संतोष डोंगरे, पद्मावती महिला बचत गट, रमाई महिला बचत गट, नालंदा वस्तीस्तर संघ तसेच विकास महिला बचत गटाच्या सदस्य व मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola