पातुर(सुनिल गाडगे) : येथील डाँ बाबासाहेब आंबेडकर चौकाला लागुनच विविध कार्रकार्यी सोसायटी व तालुका होमगार्ड कार्यलय असुन या दोन्ही कार्यलयात समोर चारचाकी व भेरीवालेने अतीक्रमण केल्याने नागरीकांना ये जा करण्यात कसरत करावी लागत आहे.
सविस्तर माहीती अशी आहे की गेल्या अनेक दीवसापासुन या कार्यलया समोर नो पार्कींग झोन परीसर असुनही या ठिकाणी मालवाहक वाहने व खानावळी वाले आपले वाहने उभी करतात. या ठीकाणावरुन जातांना महीलाना मोठी कसरत करावी लागते. या ठीकाणी ग्राहकांच्या गर्दीमुळे महीला शेतकरी व महीला होमगार्डना ये जा करणे कठीण आहे. अनेक वेळा महीलाच्या शरीलाला धक्का लागेपर्यत ग्राहक मागे पुढे पाहत नाही. या मुळे याठीकाणी मोठा वाद होण्याची शक्यता नाकरता येत नाही. वाहनधारक नेहमी या ठिकाणी महीलांशी वाद घालतात. या ठीकाणी महीला होमगार्ड बन्दोबस्त कामी या ठीकाणी ये जा करतात त्या वेळी एखाद्या वेळे मोठा अनर्थ होऊ शकतो. या बाबत होमगार्ड कार्यालयामार्फत नगर परीषद , पोलीस स्टेशन , जिल्हाधीकारी कार्यलयात वांरवार तक्रारी देण्यात आल्या तरीही आद्याप पर्यत कोणतेही कार्यवाही करण्यात आली नाही. जे कर्मचारी शाषनाची निष्काम सेवा करतात शाषनाच्या घांद्याला घांदा लावुन सेवा देतात. अश्याची दखल घेतल्या मुळे प्रशषनात कीती निष्र्कीयता आहे हे दीसुन येते. प्रशषन मोठा वाद होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न महीला कर्मचाऱ्यांना पडला. पातुर शहरात महीला असुरक्षीत असल्या सारखे वाटते एकदीवसा अगोदर नगर परीषद कार्यलयात महीलेला धक्का बुक्की करुन शिवीगाळ करण्यात आल्याने नगर परीषद कार्यलयात दंगली दृष्य परीस्थीती झाली होती. या गभीर बाबीकडे ठाणेदार योग्य दखल घेण्याची मागणी होत आहे.
अधिक वाचा : पातुर पं स अंतर्गत घरकुल महाघोटाळा उघड,कारवाईची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola