अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज H W बुश यांचं वयाच्या 94व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांचे पुत्र आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज W बुश (कनिष्ठ) एक निवेदन जारी करत म्हणाले, “जेब, नील, मार्विन आणि मला हे सांगताना हे अत्यंत दु:ख होत आहे की आमचे वडील आता या जगात नाहीत.”
जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश हे त्यांचं पूर्ण नाव होतं, मात्र जॉर्ज बुश (ज्येष्ठ) या नावाने ते ओळखले जायचे. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी लष्करी वैमानिक म्हणून भाग घेतला होतं. त्यानंतर त्यांनी टेक्सासमध्ये तेलाचा व्यापार सुरू केला आणि वयाच्या 40व्या वर्षी मिलिनेयर होऊन ‘तेलसम्राट’ म्हणून ओळख मिळवली.
1964 मध्ये रिपब्लिक पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि टेक्सासमधून निवडणूक लढवून अमेरिकन काँग्रेसमध्ये आपलं स्थान पक्क केलं. आणि 1989 ते 1993 या काळात ते अमेरिकेचे 41वे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यापूर्वी रोनाल्ड रिगन राष्ट्राध्यक्ष असताना उपराष्ट्राध्यक्ष म्हणूनही दोन कार्यकाळ पूर्ण केले होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola