तेल्हारा(शुभम सोनटक्के)- आज दि.२९-९ रोजी सकल मराठा तेल्हारा तालुक्याच्या वतीने आरक्षणासाठी आतापर्यंत मराठा समाजाचे जे बळी गेले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ टॉवर चौक तेल्हारा येथे त्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
आतापर्यंत गेल्या कित्येक दशकापासून सकल मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते त्या आंदोलनाची यश मिळत आज मराठयांना शिक्षण आणि नोकरी यात १६% आरक्षण आज विधानसभेत दोन्ही संभागृहात हा कायदा पारीत झाला यासाठी सकल मराठा समाजच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला हारापण करून सकल मराठा समाजाचे जे बळी गेले त्यांना आदरांजली वाहण्यात आली व यापुढे ही सकल मराठा समाज तेल्हारा तालुक्याच्या वतीने अन्यायाविरोधात आंदोलने सुरूच राहीतील
१ ) समाजातील कोनत्याही मूलीला लग्नासाठी योगदान लागल्यास देण्यात येईल
२) समाजातील गरजूंना वैध्यकीय सेवा पूरवने
३) होतकरू व हूशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक सायता करणे
४)महीलांच्या सूरेक्षेची जवाबदारी
स्वीकारणे तसेच महीला सशक्तीकरण करण्याचा कार्यक्रम राबवणे
५) शासकीय तथा निमशासकीय कार्यालयातील काही अडचनी असल्यास त्या सोडवने
इत्यादी कार्यक्रम सकल मराठा तेल्हारा तालुक्याच्या वतीने राबविण्यात येईल असा संदेश मराठा समन्वय यांनी दिला यावेळी श्रद्धांजली साठी बहुसंख्य सकल मराठा समाजातील व्यक्ती उपस्थित होते.