तेल्हारा ( प्रतिनिधी ) : येथील डॉ गोपाळराव खेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष तराळे हे दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असुन त्यांचा महाविद्यालयाचे वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती चे उपाध्यक्ष डा रामचंद्र शेळके ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाघ ,डॉ विठ्ठल वाघ,डॉ गजाननराव पुडकर , केशवराव मेतकर प्राचार्य केशवराव गावंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे प्राचार्य डा संतोष तराळे हे डॉ गोपाळराव खेडकर महाविद्यालयात दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी रूजु झाले या आधी डा तराळे यांनी तेल्हारा अकोला येथे प्राध्यापक म्हणून काम केले त्या नंतर त्यांची मोताळा येथे प्राचार्य पदी निवड झाली त्यानंतर ते डॉ गोपाळराव खेडकर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रूजु झाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना उच्चपदा पर्यंत नेले आजही सरांचे विघार्थि उच्च पदावर कार्यरत आहेत डा गोपाळराव खेडकर महाविद्यालयात सेवारत असतात प्राचार्य डॉ संतोष तराळे यांनी महाविद्यालय प्रगती पथावर नेले.
डॉ तराळे यांनी आपल्या कार्यकाळात डा पंजाबराव देशमुख जयंती उत्सवानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रम आयोजित केले होते शिवाय महाविद्यालयामध्ये विधाथी विघार्याथीनी साठी सुखसुविधा ही उपलब्ध करून दिल्या त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन केले आलेल्या तक्रारीं वरही वेळीच उपाययोजना करून देण्यात आली महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी साठी आलेल्या सुविधा योजना विद्याथ्र्यांपर्यत पोहचुन त्यांना लाभ दिला गेला.शिवाय प्राध्यापकाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले शिवाजी शिक्षण संस्थाच्या अध्यक्ष ,सदस्य, यांच्या कडुन आलेल्या आदेशाचे पालन केले.
या महाविद्यालयात सेवारत असतात प्राचार्य डॉ संतोष तराळे यांनी विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश दिला रूजु होताच विद्यार्थी संख्या वाढविली महाविद्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली प्रवेशद्वार भाऊसाहेब देशमुख पुतळ्याची उभारणी ग्रंथालय एम पि एस सी व इतर स्पर्धाच्या तयारी सर्व सुविधा करून देण्यात आली विद्यालयात च्या वाढत्या टक्केवाढी विशेष लक्ष दिले.या महाविद्यालयात सेवारत असतात मला तेल्हारा तालुक्यातुन भरीव असे सहकार्य लाभले आज हे महाविद्यालय सोडुन जाताना मला दुःख होत असल्याचे प्राचार्य डॉ संतोष तराळे यांनी सांगितले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola