गोसीखुर्द आणि जिगाव सिंचन घोटाळ्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार आहेत, असे प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांनी मे.मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे अजित पवारांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सिंचन क्षेत्रात सुमारे ३५ हजार कोटी रुपये खर्चाबाबत अनियमितता पुढे आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशी सुरू केली होती. ए.सी.बी.ने अजित पवार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांचीही चौकशी केली होती.सिंचन प्रकल्पांच्या कंत्राटांसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला. अपात्र कंत्राटदारांना ही कंत्राटे देण्यात आली. प्रकल्पांना विलंब झाल्याने खर्चातही भरमसाठ वाढ झाली, असा ठपका ए.सी.बी.ने ठेवला आहे.दरम्यान, भा.ज.पा. ऐन निवडणुकांच्या आधी आकसाने ही कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola