अकोला (शब्बीर खान) : रेल्वेखाली आल्याने एका ४८ वर्षीय इसमाचे दोन पाय मांडीपासून तुटल्याची घटना रविवारी उघडकीस आली असून, याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने इसमाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. बाळापूर नाका परिसरातील रहिवासी वसंतराव रामभाऊ मोरे (४८) हे सकाळी रेल्वे रुळावर दोन्ही पाय तुटलेल्या अवस्थेत रेल्वेचे कर्मचारी मोहम्मद इदरीस यांना रविवारी सकाळी ७ वाजता दिसून आले. त्यांनी १०८ या रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर डॉक्टर जुबेर नदीम हे आपल्या लोकोपायलट नितीन साठे यांच्यासोबत अॅम्ब्युलन्स घेऊन आले. त्यांनी तत्काळ वसंतराव मोरे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. पाय तुटलेल्या अवस्थेत असलेल्या वसंतराव मोरे यांना डॉ. जुबेर यांना स्वत:चे नाव व पत्तासुद्धा सांगितला. रुग्णाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी रुग्णाला रक्ताची आवश्यकता पाहून त्यांना मदत केली. मोरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असेल तर कशासाठी, त्याचे नेमके कारण काय, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
अधिक वाचा : किरकोळ वादातून युवकाची हत्या! मोठी उमरी परिसरातील घटना
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola