कॅलिफोर्निया: मंगळ ग्रहावरील रहस्य उलगडण्यासाठी ‘नासा’नं (NASA) सोडलेलं ‘मार्स इनसाइट लेंडर’ हे यान सहा महिन्यांहून अधिक काळ आणि ३०० दशलक्ष मैलांचा प्रवास करून अखेर मंगळावर यशस्वीपणे उतरलं. सोमवारी मध्यरात्री १ वाजून २४ मिनिटांनी ते मंगळावर पोहोचलं. मंगळ ग्रहाची अंतर्गत संरचना पृथ्वीपेक्षा किती वेगळी आहे, याचा शोध हे यान घेणार आहे. या ऐतिहासिक घटनेचं नासानं थेट प्रेक्षपण केलं.
मंगळाच्या कक्षेत पोहोचताना इनसाइटचा वेग १९८०० किलोमीटर प्रतितास इतका होता. मात्र, उतरताना त्याचा वेग कमी होऊन तो ८ किलोमीटर प्रतितास इतका झाला. हे यान मंगळावर उतरतानाची प्रक्रिया सात मिनिटांपर्यंत सुरू होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी मध्यरात्री १. २४ वाजता ते मंगळावर उतरलं. त्यावेळी वैज्ञानिकांनी जल्लोष केला. नासाचे प्रमुख जिम ब्राइडेंस्टाइन यांनी इनसाइट यान यशस्वीपणे उतरल्याची घोषणा करत सर्व वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. यावर्षी ५ मे रोजी नासानं कॅलिफोर्नियाच्या वंडनबर्ग एअरफोर्स स्टेशनवरून एटलस व्ही रॉकेटद्वारे या यानाचं प्रक्षेपण केलं होतं. यापूर्वी २०१२ मध्ये मंगळावर क्युरोसिटी हे यान पाठवण्यात आलं होतं. तेव्हा मंगळावर पाणी असल्याचा शोध लागला होता.
अधिक वाचा : विलियम नर्डहॉस आणि पॉल रोमर यांना अर्थशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola