‘मुंबई- पुणे- मुंबई’ चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. गौतम आणि गौरी म्हणजेच स्वप्नील, मुग्धाची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. आता या गाजलेल्या चित्रपटाचा तिसरा भाग पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे.
या बहुप्रतिशिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. एकमेकांशी सतत भांडणाऱ्या या जोडीच्या संसारवेलीवर एक गोंडस फुल उमलणार आहे आणि हिच गोष्ट ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ मध्ये पाहायला मिळणार आहे. तिसरा भाग येणारा हा कदाचित मराठीमधला पहिलाच चित्रपट असेल. करिअरला प्राधान्य देत संसाराचा गाडा सांभाळणाऱ्या गौरी गौतमच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार म्हटल्यावर दोन्ही घरात एकच गडबड गोंधळ सुरू होतो, अशी साधारण हलकीफुलकी कहाणी ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ मध्ये दिसणार आहे.
सतिश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई- पुणे- मुंबई’ ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आलेल्या चित्रपटाच्या सिक्वललाही महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अगदी अमेरिका, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमधील चित्रपट रसिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यामुळे एकंदरच गौतम आणि गौरीवरचं प्रेक्षकांचं प्रेम पाहता या प्रेमकथेचा आणखी एक पदर ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ मध्ये उलगडणार आहे. हा चित्रपट संपूर्ण राज्यात ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. दोन भागांना प्रेक्षकांकडून मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर तिसऱ्या भागाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अधिक वाचा : इमरान हाश्मीच्या ‘चिट इंडिया’ चा टिझर रिलीझ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola