नवी दिल्ली – भारतीय जनता पक्ष निवडणुकीचा प्रचार करण्यात नेहमीच पुढे असतो. भाजपने आता टीव्हीवर जाहिरात देण्याच्या बाबतीतही मोठमोठ्या कंपन्यांनाही मागे टाकले आहे. भाजप या आठवड्यात टीव्ही चॅनलमध्ये जाहिराती देण्यात सर्वात पुढे आहे.
भाजपने या आठवड्यात जाहिरात देण्यात क्रमांक १ वर उडी घेतली असल्याचे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क) यांनी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. भाजपने याप्रकारात अनेक प्रसिद्ध खासगी कंपन्यांनादेखील मागे सोडले आहे. भाजपने हिंदुस्तान युनिलिव्हर, डेटॉल, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, विमल पान मसाला आणि ट्रिवॉगो यासारख्या नेहमी जाहिरात देणा-या कंपन्यांनाही बरेच मागे टाकले आहे.
मागील आठवड्यात विमल पान मसाला १ क्रमांकावर होता. भाजपच्या या आठवड्यात विविध टीव्ही चॅनेलवर २२ हजार ९९ वेळा जाहिराती प्रसारित करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या स्थानावर नेटफ्लिक्स होती. त्यांनी १२ हजार ९५१ जाहिराती दाखवल्या. तिस-या स्थानी ट्रिवागो, चौथ्या क्रमांकावर संतूर आणि ५ व्या स्थानी डेटॉल साबन ही कंपनी होती.
अधिक वाचा : लोकसभा २०१९ निवडणूक लढणार नाही: सुषमा स्वराज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola