पातूर (सुनिल गाडगे) : तालुक्यातील देऊळगाव शेत शिवारात येत असलेल्या आणि पातूर -बाळापूर या राज्य मार्गावर केवळ पन्नास फुटा चे अंतरावर असलेल्या एका खासगी शेतकरी यांचे गोडाऊन मधील 24 क्विंटल सोयाबीन अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी सिनेमा स्टाईल चोरी करून लंपास केले चोरी गेलेल्या सोयाबीन ची किंमत जवळपास साठ हजार रुपये आहे.
पातूर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली ,श्री दामोदर बरडे रा, देऊळगाव यांनी ही तक्रार दिली असून यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,सदर घटना शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत(8 नोव्हेंबर ते9नोव्हेंबर)रोजी झाली आहे
तब्बल 15 दिवस झाले मात्र सुगावा लागला नाही यामुळे शेतकरी श्री बरडे हतबल झाले आहेत पातूर पोलिसात ते फेऱ्या करीत आहेत, सततची नापिकी ने कंटाळलेल्या दामोदर बरडे याना यावर्षी सोयाबीन चे चांगले पीक झाले होते मात्र चोरट्यांनी हा त्यांच्या तोंडी आलेला घास चोरट्यांनी पळवला आहे.
चोरी झाली त्या ठिकाणी दामोदर बरडे यांचा धाबा आहे आणि धाब्यावर सि सी टी व्ही केमेरे लावले आहेत या मध्ये एका चार चाकी वाहन आले आणि गाडी मधील 5जण खाली उतरून त्यांनी बिनबोभाट चोरी केली यातील वाहन हे पातूर च्या दिशेने मुख्य मार्गावरून गेल्याचा अंदाज आहे त्यामुळे रस्त्यावरील कॅमेरे तपासणी करणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.
तसेच यातील वाहन हे पातूर जुने बसस्थानक कडे आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे यामुळे या मार्गावरील सोन्याच्या दुकानासमोरील कॅमेरे पडताळणी करणे आवश्यक आहे 2 वर्ष पासुन पिके नाहीत मागच्या वर्षी केवळ एकरी एक पोते झाले 20एकर सोयाबीन होते मशागत खर्च निघाला नाही पातूर पोलिसांनी तपास कामी गती द्यावी या घटनेची दामोदर बरडे या शेतकरी यांनी धास्ती घेतली असून, चोरी मूळे भयभीत झाले असून त्यांनी चोरीच्या तपासाला गती देण्याची मागणी केली आहे या घटनेचा तपास पातूर पोलीस समोर आव्हान असून चोरट्यांचा तपास आणि चोरीचा छडा कसा लावतात याकडे हतबल शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : पातूर शहरामध्ये मा.संजय भाऊ राठोड महसूल राज्यमंत्री यांचे सहविचार सभा संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola