मुंबई : मुंबईतील फेरीवाल्यांचे प्रश्न, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सत्तेत असूनही जर जागा मिळत नसेल तर यासारखे दुसरे दुर्देव नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी आज विविध मुद्यांवर आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली. आयुक्तांच्या चर्चेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी शिवसेना, सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महापौरांच्या बंगल्याविषयीही आपले परखड मत व्यक्त केले. स्वत:च्या स्वार्थासाठी महापौरांचा बंगाला घेत जात असल्याचे सांगत महापौर पदाची ही चेष्टा लावली जात आहे असे मत व्यक्त केले.
शिवाजी पार्कातील जिमखान्याचे आरक्षण बदलून त्या ठिकाणी महापौर निवासस्थान उभारण्याचा घाट घातला जात आहे. पण तिथे महापौर बंगला बांधून देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर त्यांनी पालिकेतील अधिकार्यांवर पैसे घेत असल्याची टीका केली. फेरीवाल्यांना पैसे घेऊन ते बसायला देतात असंही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : राष्ट्रवादीचे माजी नेते तारिक अन्वर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola