मुंबई : दूध व अन्नपदार्थांमध्ये दूध भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना यापुढं जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. त्यासाठी कायदा केला जाणार असून तसं विधेयक लवकरच सभागृहात मांडलं जाईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आज विधानपरिषदेत केली.
विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बापट यांनी भेसळीचा गुन्हा अजामीनपात्र करण्यात येईल, असं सांगितलं. याआधी हा गुन्हा अदखलपात्र होता. तसंच, गुन्ह्याची शिक्षा फक्त सहा महिन्यांपर्यंत होती. त्यामुळं कायद्याचा धाक नव्हता. मात्र, यापुढं हा गुन्हा दखलपात्र नसेल. या संदर्भातील कायदा आणखी कठोर केला जाईल. गुन्ह्याची तीव्रता पाहून सहा महिन्यांपासून ते जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा सुनावण्यात येईल, असंही बापट यांनी स्पष्ट केलं.
अधिक वाचा : तर नववर्षात महाराष्ट्रात चक्का जाम बालाजी शिंदे यांचा इशारा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola