अकोला (प्रतिनिधी) : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अकोला महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी एकात्मतेची शपथ घेतली.
अकोला महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपमहापौर वैशालीताई शेळके यांच्या हस्ते माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हारार्पण करण्यात आले. यानंतर सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.
यावेळी नगरसेवक जमीरभाई बर्तनवाले, क्षेत्रीय अधिकारी डॉ. दिपाली भोसले, कु. पूनम कळंबे, नगरसचिव अनिल बिडवे, अधीक्षक वसंत मोहोकार, दिलीप जाधव, श्याम राऊत, रवि शिरसाट, मुकुंद घाटगे, किशोर सोनटक्के, विजय वरुडकर, पुरुषोत्तम इंग़ळे, भगवान गायकवाड आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण सुरू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola