अकोला (शब्बीर खान) : अकोला जुने शहरचे पोलीस निरीक्षक अन्वर शेख, पोलीस उप निरीक्षक पोटभरे यांनी पोलीस कोठडीत असलेल्या मंगेश धोटे आणि सुनील ढाकरे या आरोपींना व्ही आय पी वागणूक देऊन फिर्यादीनुसार कारवाई किंवा तपास न करता फिर्यादीच्या बाजूने न्यायालयाचा निकाल येऊ नये यासाठी पुरावे नष्ट करतांनाच पदाचा गैरवापर करून आरोपींना मदत केली असल्याची तक्रार अग्रवाल पीडित कुटुंबाने पोलिस महासंचालक मुंबई, अमरावती पोलिस आयुक्त यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक यांना रजिस्टर पोस्टाने पाठविली आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करून आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतांना अग्रवाल यांनी जोड धंदा म्हणून मित्रासोबत ठोक्याने शेती केली. त्या शेतातील पीक परस्पर विक्री करून १ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम आरोपींनी परस्पर हडप केली आहे. ही रक्कम वारंवार मागणी करूनही परत केली नसल्याने अखेर अग्रवाल कुटंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली परंतु तक्रार दिल्या नंतर पूर्वीचे मित्र मंगेश धोटे आणि सुनील ढाकरे यांनी गैरकायद्याची मंडळी जमा करून अग्रवालच्या घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. ती तक्रार ही पोलीस ठाण्यात दिली परंतु पोलीसांनी आरोपींना पाठीशी घालत कारवाई केली नाही म्हणून वरिष्ठ अधिकारी यांचेकडे तक्रार दिली. त्यानंतरही कारवाई झाली नसल्याने अखेर गेल्या १५ ऑगस्ट २०१८ रोजी दिल्ली येथे गोपाल अग्रवालने कुटुंबासह जाऊन आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी अग्रवाल कुटुंब दिल्लीत जाऊन धडकले होते.
परंतु नंतर पोलिस सदाशिव सुडकर यांच्या फोनवरून दिलेल्या तक्रारीवर आरोपी विरोधात गुन्हे दाखल केले ; मात्र मंगेश धोटे आणि सुनील ढाकरे हे आरोपी पोलीस कोठडीत असतांना आरोपीसारखी वागणूक न देता व्ही आय पी वागणूक देऊन आरोपी मंगेश धोटे आणि सुनील ढाकरे आणि पोलीस यांनी संगनमत करून माझी आर्थिक फसवणूक करून आरोपी विरोधात गुन्हा सिध्द होऊ नये यासाठी पुरावे नष्ट करण्यासाठी पोलीस अधिकारी पदाचा गैरफायदा घेतला असल्याची तक्रार अग्रवाल यांनी पोलीस महासंचालक मुंबई, अमरावती पोलिस आयुक्त यांच्यासह अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे रजिस्टर पोस्टाने पाठविली आहे. त्यामुळे आता तरी अग्रवाल कुटुंबाला न्याय मिळेल काय? याचीच चर्चा सुरू झाली आहे.
अधिक वाचा : जावई व साळ्याने केले युवतीचे लैंगिक शोषण; बलात्काराचा गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola